
दैनिक चालू वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- इंद्रसिंग वसावे
वाडीबार हे गाव अक्कलकुवा ते मोलगी या मुख्य रस्त्याच्या लगत असलेलं गाव आहे. तरी या गावाची परिस्थिती अद्याप देखील दैनिक अवस्थेत आहे.
म्हणूनच आमचं सर्व ग्रामस्थांचे रास्त मागणी आहे.
अनेक वेळा स्थानिक प्रशासन दरबारी न्याय मागणी करिता बरेच प्रयत्न केले, परंतू अद्याप आम्हाला रस्त्याचं विकास जणू काही आम्ही सावत्र सारखं दूजाभाव करून आम्हाला विकास पासून वंचित ठेवलं जात आहे.
आम्ही अनेक वेळा मा. आमदार अँड. के. सी. पाडवी व खासदार डॉ. हिनाताई गावीत, व स्थानिक प्रशासनाला देखील अनेकदा निवेदन देखील दिलं, परंतू त्यांनी आम्हाला दाद दिलं नाही.
म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने थेट नवनिर्वाचित मा.मुखमंत्री एकनाथ शिंदे, साहेब यांना निदर्शनास आणून देऊ इच्छितो, व निश्चितच मा. मुख्य मंत्री आम्हाला न्याय देऊन आमचं प्रलंबित समस्या मार्गी लावाल असे धन्य मानतो.
स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वाडीबार गावातील जनतेला दूजाभाव करून फक्त अश्वासन दिली, फक्त कागदांवरच रस्ता दिसतो,
भारत स्वतंत्र झाल्यापासून आज पर्यंत गावाला पुर्ण रस्ता बनवून मिळालेला नाही. आज रस्त्यावर दरोड कोसळलेली आहे. व काही ठिकाणी रस्ता हा पुर्ण खराब झाला, असून येण्याजाण्या करिता लोकांना पायपीट करावी लागत आहे.
स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असून याचा ग्रामस्थांना मोठा फटका बसलेला आहे. वाडीबार गावातील रस्ता का? पुर्ण होत नाही, असे ठोस सवाल मा. श्री गणेश बी. पाडवी, यांनी उपस्थित केले आहे. सेलपाणी पाडा ते वाडीबार हा एक मुख्य रस्ता असून त्या गावाला सोयीस्कर आहे, तसेच शिंदी सर ते वाडीबार फाटा हे दोन रस्ते आज पर्यंत फक्त कगदावरच आहे, प्रत्याक्षात मात्र पुर्ण झाले नाही. गावातील अंधाऱ्यात ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी बिलकूल लक्ष दिले नाही. मोलगी व अक्कलकुवा येथे जाण्या करिता 5 ते 6 किलोमीटर पायी जावे लागत आहे. म्हणून आमदार साहेब व खासदार ताई यांना विनंती आहे. की, आमचे रस्ते लवकरात लवकर दरोड हटवुन रस्त्या ची पर्यायी व्यवस्था म्हणून दुरुस्त करुन द्यावे.
हिच अपेक्षा.