
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
भूम :भूम तालुक्यातील उळूप येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भूम तालुका संघटक हनुमंत सानप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असुन त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापने पासुन काम केले आहे त्यामुळे लवकर च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भूम तालुक्यात खिंडार पडणार आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमूख अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमूख गौतम लटके , भूम -परांडा -वाशी विधान सभा समन्वयक दिलिप शाळू महाराज ‘ युवासेना भूम – परांडा -वाशी विधान सभा प्रमूख प्रल्हाद आडागळे , युवासेना उपजिल्हा प्रमूख उमेश जाधव , .भूम तालुका प्रमुख अँड श्रीनिवास जाधवर , वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे , वाशी तालुका समन्वयक श्रीराम घुले , शहरप्रमुख प्रकाश आकरे , मानधन कलाकार समीती माजी अध्यक्ष महादेव वारे . उपतालुका प्रमूख अशोक वनवे , रफिक तांबोळी ,माजी शहरप्रमुख रामभाऊ नाईकवाडी , युवासेना शहर अधिकारी अविनाश जाधव , राजेंद्र खंडागळे , सुनिल गपाट ,भरत सुरवसे यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.