
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
काव्यप्रेमी शिक्षक मंच पुणे यांच्या वतीने ,गुरूंना करण्यासाठी वार शुक्रवार दि.२९/०७/२०२२ रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष म्हणून उल्हासनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतुरकर उपस्थित होते.तर कृष्णा शिंदे ,मुख्य मंचाचे कोषाध्यक्ष युवा साहित्यिक सोलापूर यांनी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे व संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पूजन करून संमेलनाचे उदघाटन केले.
यावेळी आनंद घोडके( काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष), संदीप वाघोले (राज्यसदस्य), बबन धुमाळ(पुणे जिल्हा अध्यक्ष), शकील जाफरी (पुणे जिल्हा उपाध्यक्ष) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजेश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर असे तीन तासांचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भरातून कवी कवयित्री उपस्थित होते.ते पुढीलप्रमाणे अनिल नाटेकर,अंजली सामंत, कांचन मून,रवींद्र तनपुरे,सुभद्रासुत आंधळे, अंजली वारकरी,राजेश चौधरी,सुजाता भोजने,दीपक जाधव,गीता वाळके, अनिसा शेख,अंकुश जाधव,शरदचंद्र हयातनगरकर,वैशाली लांडगे, सौरभ नवले, प्रतिमा काळे,मनीषा खामकर, कविता काळे ,बबन धुमाळ,शकील जाफरी,संदीप वाघोले ,रणजित पवार,इत्यादी कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे प्रास्ताविक मनिषा खामकर(सहसचिव पुणे) ,सूत्रसंचालन कविता काळे(सुप्रसिद्ध गझलकारा) तर आभार रणजित पवार (सचिव पुणे जिल्हा)यांनी मानले.
अशी माहिती आयोजक संयोजक रणजित पवार यांनी दिली.