
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
तळोदा तालुक्यातील झिरी (पाठडी) येथे सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी, भारती उद्योग व भारती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, युवक, महिला मंडळ व गरजू लोकांना सालाबादप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते १५ लाख रोपांचे वाटप करण्यात आले.भारती उद्योगामार्फत उभारलेली मिनी राईस मिलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
झिरी (पाठडी) येथे रोप वाटप व राईस मिलचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आ.आमश्या पाडवी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड.सिमा वळवी,मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीक्लचर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन पर्यावरणप्रेमी, माजी मंत्री.ऍड.पद्माकर वळवी,भारती फाउंडेशन व भारती उद्योगाच्या अध्यक्षा योगीताताई पद्माकर वळवी,आदिवासी एकता परिषदेचे सांगल्याभाई वळवी,दरबारसिंग पाडवी, एकता परिषदेचे भिमसिंग वळवी,जि.प.सदस्य सुहास नाईक,प्रताप वसावे, निशाताई वळवी नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, कुणाल वसावे, प.स.सदस्य सुमनबाई वळवी, अर्जुन वळवी, सुधाकर वळवी, अभियंता दिनेश पाटील, जि.डी पाडवी, प.स.सदस्य आनंदा दादा,ओरसिंग पटले, कृषि विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे,शिवराम वळवी, धर्मेंद्र वळवी, राजकुमार पाडवी, गणेश पाटील, सिताराम रहासे, राहुनल पाडवी आदी उपस्थीत होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कुलदैवत याहामाता मातेच्या पुजन करण्यात आले.
यावेळी प्रस्तावना करतांना माजी मंत्री.ऍड.पद्माकर वळवी म्हणाले कि, सातपुडा हरित अभियान गेल्या २० वर्षांपासुन सुरू असुन आतापर्यंत करोडो रोपांचे वाटप करण्यात आले आहे. ५०० शेतकरी मिळुन सातपुडा ग्रीन व्हॅली ऍग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून बांबु प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे.सातपुड्यातील बांबु संपण्याच्या मार्गावर असतांना डांग, पेड सुरगणा, मध्य प्रदेशातुन बांबुचे बियाणे मागवुन रोपे बनवुन वाटप केले.अद्याप २५ लाखाच्यावर रोपे शिल्लक आहेत.नाविन्यपूर्ण अश्या या उपक्रमामुळे पडीक जमिनीवर लागवड केल्यास उत्पन्नाचे साधन, नदी-नाल्यापासून शेतजमीनीचे संरक्षण, जमिनीची धूप थांबविणे, शेतीपूरक उत्पादन म्हणून झाडाची लागवड केल्यास पाण्याची पातळी वाढण्यास उपयोगी, जमिनीचे संरक्षण, पर्यावरण संतुलनास मदत व वृक्ष लागवडीमुळे आदिवासी भागाची गतवैभवाची ओळख पुन्हा प्राप्त होण्यासाठी सातपुडा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावणे काळाची गरज आहे.त्यामुळे सर्वांनी मिळुन सातपुडा हरित करण्यासाठी सामुहिक वुक्षारोपण करून संगोपण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगीतले.
यावेळी बोलतांना मा.आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले कि, गेल्या २० वर्षांपासुन सामाजीक बांधीलकी जोपासत रोपांचे वाटप करीत सातपुड्याचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मा.मंत्री पद्माकर वळवी झटत आहेत. शासनाच्या भरवश्यावर न राहता मा.मंत्री पद्माकर वळवी यांनी आखलेल्या योजनेनुसार सातपुड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री.रघुवंशी यांनी केले.
यावेळी आ.आमश्या पाडवी म्हणाले कि,आदिवासी समाज हा प्रकृती पुजक समाज आहे.शासनाने व जिल्हा परिषदेने विविध योजना देतांना सातबार्यात झाडांची नोंद पाहुनच योजना देण्याचा नियम काढावा, शेतकरीच वृक्षारोपण व वुक्षसंगोपण करू शकतो. सातपुड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतने.
आभार जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी केले.त्यांनी सांगीतले की, सातपुडा हरित अभियान गेल्या २० वर्षांपासुन सुरू असुन आतापर्यंत करोडो रोपांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियानास तिव्र गती देण्यासाठी सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगीतले.
यावेळी महाराष्ट्र गुजरात असा भेद न करता शेतकरी, युवक, महिला मंडळ व गरजू लोकांना बांबू, साग, कडुलिंब, सीताफळ व महू अश्या विविध १५ लाख रोपांचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भारती उद्योगामार्फत उभारलेली मिनी राईस मिलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी कंपनी सदस्य, सर्व मित्र परिवार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थीत होते.