दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर पाटील यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्री लक्ष्मण साळुंखे यांनी केले. मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राच्या माहितीतून सध्याच्या विद्यार्थ्यांच्या जीवन चरित्राशी सांगड घालून मौल्यवान असे मार्गदर्शन केले. श्री लक्ष्मण साळुंखे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती सांगितली. तसेच शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षक श्री संदीप चौधरी ,श्रीमती सीमा तेले, श्री अक्षय राजपूत यांचे सहकार्य लाभले.
