दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया!
मुंबई: देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असे विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात फक्त भाजप राहणार आहे, बाकी सर्व पक्ष संपणार आहेत, असंही नड्डा म्हणाले होते. या वक्तव्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वक्तव्यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी राज्यातील पक्षांविषयी वक्तव्य केले.
जे पी नड्डा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना शिवसेना आणि भाजप युती असे म्हणायचे असेल. राज्यात सध्या युती आहे. ते म्हणताना त्यांची चूक झाली असेल अस मला वाटत आहे. ज्या शिवसेनेने त्यांना फसवले आहे, त्यांच्याबद्दल ते म्हणत असतील तर त्यांच्यावर मी काही कमेंट करु इच्छीत नाही, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे”. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार असा दावाही यावेळी नड्डा यांंनी केला.
