
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: शहरांमध्ये हजारो पीएमपी बसेस धावतात तर यामधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. सार्वजनिक वाहतूक आणि कमी खर्चात परवडणारी सेवा यामुळे नोकरदार महिला, विद्यार्थी, युवक यांच्याकडून पीएमपी सेवेला प्राधान्य दिले जाते. परंतु, गेल्या महिन्यांत तीन वेळा पीएमपी बसला झालेल्या अपघातामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच वाहतुकीचे आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असल्याशिवाय बस रस्त्यावर धावत नाही. बसमध्ये आग विझविण्याचे उपकरण दिलेले आहेत तसेच कर्मचाऱ्यांनाही तसे प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. सीट बेल्ट संदर्भात पत्रक काढून त्याबद्दल चालकांना सुरक्षित प्रवासासाठी सूचना देण्यात येईल. असे प्रशासनाने सांगितले.
इतर वाहन चालकांप्रमाणेच पीएमपी चालकांनी सीट बेल्ट लावणे सुरक्षेच्या दृष्टीने अनिवार्य आहे. प्रशासनाने तशा सूचना त्यांच्या चालकांना द्याव्यात आणि त्यानंतर जर चालकांनी त्या सूचना पाळल्या नाहीत तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.