
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अतनुरात विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, महिला मंडळ, विविध पक्ष, पार्टीच्या वतीने सोमवारी अभिवादन करण्यात आले.
येथील लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर च्या वतीने प्रदेशअध्यक्ष एस.जी.शिंदे, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूरच्या वतीने प्रविण सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूरच्या वतीने बी.जी.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने सचिव सौ.संध्या बालासाहेब शिंदे, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या वतीने सौ.शोभा शिंदे, जयहिंद क्रिडा व व्यायाम शाळा अतनूरच्या वतीने हणमंत साळुंके, भारतीय कामगार संघटनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या वतीने लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे, महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, सचिव सौ.संध्या शिंदे, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार काँग्रेसच्या वतीने तालुकाअध्यक्षा सौ.एम.व्ही.बिरादार, सौ.मनिषा सुर्यवंशी अंबानगर, सौ.माया बुक्तर-कांबळे, महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने आशा स्वयंसेविका तथा तालुकाअध्यक्षा सौ.मायादेवी मुंडकर-बिरादार आवलकोंडेकर, सौ.मनिषाताई सुर्यवंशी अंबानगरकर, पत्रकार तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, पत्रकार संजय शिंदे यांच्या हस्ते विविध संस्थेच्या कार्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील क्रांती कार्य, लेखन व साहित्य क्षेत्रासह, शाहिरी संयुक्त लढा, योगदान या क्रांतीकार्याला उजाळा देण्यात आला. साहित्य क्षेत्रातील लेखणीच्या व डफावर केलेल्या भरीव कार्य व जीवनचरित्रावर दलितमित्र बालासाहेब शिंदे यांनी आपले विचार मांडले.