
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : आगामी काळात होऊ घातलेल्या परभणी शहर महापालिका निवडणुका-२०२२ च्या अनुषंगाने नियोजित प्रभाग रचनेची आरक्षण सोडत आज सकाळी घेतली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बी. रघुनाथ सभागृहात शुक्रवार, दि. ०५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता ही सोडत घेतली जाणार आहे. अ.जा.महिला व अ.ज. महिला, सर्वसाधारण पुरुष व महिला अशा विविध प्रभाग आरक्षणाच्या सोडतीचा अंतर्भाव यात असून प्रारुप याद्याही आजच संध्याकाळ पर्यंत प्रकाशित करण्यात येणार आहेत तर हरकती व सूचना शनिवार, दि. ०६/०८/२०२२ पासून ०८ ०८/२०२२ पर्यंत सादर करता येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले सांगितले आहे.