
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय नांदेड अंतर्गत कामगार कल्याण केंद्र चौफाळा नांदेड यांच्या मार्फत दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत कामगार त्यांच्यासाठी बियाणी डेव्हलपर्स येथे प्रत्यक्ष साइटवर दुपारी 2 वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले सदर आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून श्री राऊत सर सुपरवायझर बियाणी डेव्हलपर्स नांदेड व डॉ. चामलवार सर डॉ.आशिष चव्हाण तसेच कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री एस व्ही राठोड यांनी केले तर या कार्यक्रमास नांदेड गटातील सर्व केंद्रप्रमुख यांनी सहकार्य केले असून तर कार्यक्रमाचे नियोजन कामगार कल्याण केंद्र चौफाळा नांदेड येथील कर्मचारी श्री शेख जावेद श्रीमती शिंदे श्रीमती केव्हारे यांनी केले सदर कार्यक्रम शिबिरात एकूण 35-40 कामगारांनी भाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला