दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि: जब्बार मुलाणी
===================
गेल्या अनेक वर्षापासून सेवा देत असलेला रिक्षाचालक महागाई मधे होरपळला गेला आहे CNG चे दर दिवसेंदिवस वाढत आहेत घरखर्च वाढत आहे त्यात मुक्त रिक्षा परवान्यांनमुळे आणि बेकायदेशिर अँपवर आधारीत,कार,बाईक सेवेमुळे हतबल झाला आहे.त्यात आम आदमी रिक्षाचालक संघटनेने आंदोलनाचा 12 वा दिवस
आज रिक्षाचालकांसमोर वाढत्या महागाई मुळे कसे जगायचे? हा प्रश्न ऊपस्थित झाला आहे.गेल्या बार दिवसांपासून आर.टि.ओ.पुणे धरणे आंदोलन रिक्षाचालकांच्या हक्कासाठी संघटना करत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सेवा देत असलेला रिक्षाचालक महागाई मधे होरपळला गेला आहे CNG चे दर दिवसेंदिवस वाढत आहेत घरखर्च वाढत आहे त्यात मुक्त रिक्षा परवान्यांनमुळे आणि बेकायदेशिर अँपवर आधारीत,कार,बाईक सेवेमुळे हतबल झाला आहे.त्यात आम आदमी रिक्षाचालक संघटनेनेप्रशासनाला,नागरिकांना वेठिस न धरता बेमुदत धरणे आंदोलन मागण्या पुर्ण होईपर्यत पुकारले आहे.प्रशासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन तिव्र होत जाईल यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी..
आम आदमी रिक्शा चालक संघटनेची खालील
प्रमुख मागण्या आहेत
👉खटूआ समितीच्या शिफारशीनुसार मिटरवाढ मिळालीच पाहिजे.
👉बाईक टॕक्सिवर कारवाई करा.
👉रिक्षा परमिट बंद झालेच पाहिजे.
👉ओला,उबरवर कारवाई झालीच पाहिजे.
👉कँलिब्रेशन कँसल करून टेरिफकार्ड मिळालेच पाहिजे.
👉15 वर्षावरिल रिक्षा पासिंगचा दंड माफ झालाच पाहिजे.
👉कल्याणकारी मंडळाची अम्मलबजावणी झालीच पाहिजे
👉CNG चे दर कमी झालेच पाहिजे.
या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहित तो पर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे प्रशासनाने दखल नघेतल्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून संघटनेच्या पदाधिकारी आणि रिक्षाचालकांनी केस मुंडन करून निषेध व्यक्त केला
मुंडन केलेले पदाधिकारी
आनंद अंकुश-अध्यक्ष
जिबरील शेख-उपाध्यक्ष
गणेश ढमाले-सचिव
केदार ढमाले-खजिनदार
चाँद शेख-सहकार्याध्यक्ष
आरिफ शेख-ईशान्य रिक्षा स्टँड
इतर रिक्षाचालकांनी मुंडन करून आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला.
आंदोलनास रिक्षाचालक मालक संघटना कृति समिती पुणे जिल्हा यांनी पाठिंबा दिला आहे.
क्रांतीदिन 9 आॕगस्ट रोजी CNG दरवाढी विरोधात आंदोलन तिव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
लढेंगे जितेंगे
आम आदमी रिक्षाचालक संघटना
