
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
भोरखेडा येथील आर सी पटेल विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी मा. दीपक भिल, सरपंच मा. गायकवाड साहेब शि. वि. अ. मा. किरण ढीवरे केंद्रप्रमुख तसेच गावातील मा. सुदाम तात्या मा. सचिन राजपूत मा. रघुनाथ राजपूत मा. भूपेंद्र राजपूत मा. कल्याण राजपूत व इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या रॅलीचा शुभारंभ मा. गायकवाड साहेब व किरण ढीवरे यांनी हिरव्या पताका दाखवून केला. स्वातंत्र्यसेनानींच्या रूपातील विद्यार्थी,प्रशस्त बॅनर्स, तिरंगी झेंडे, अनेक घोषणांची फलके, लेझीम पथक, बँड हे या रॅलीचे वैशिष्ट्य होते. रॅलीतील विद्यार्थी विद्यालय ते भोरखेडा गावातून दिमाखात निघाले. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो आहे. या महोत्सवाची माहिती व जाणीव सर्व ग्रामस्थांना व्हावी, गावामध्ये सकारात्मक असे वातावरण निर्माण व्हावे असा या रॅलीचा उद्देश होता. ‘घर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन गावकऱ्यांना या निमित्ताने करण्यात आले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी श्री आर एफ शिरसाठ मुख्या. माध्यमिक विभाग , श्री पी व्ही पाटील पर्यवेक्षक,श्री ईश्वर पाटील मुख्या. प्राथमिक विभाग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली.