
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधुन मातंग एकता आंदोलन संघटनचे युवक आघाडी अध्यक्ष किरण लोंढे आणि त्यांच्या पत्नी रेश्मा लोंढे या दांपत्याकडुन धनकवडी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना १०२ छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यासोबतच १०२ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे आवर्जून उपस्थित होते त्यांचे हस्ते अत्यंत गरिबीत वाढलेल्या आणि आयआयटी मध्ये उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या सचिन कांबळे या विद्यार्थ्याच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी त्याची आई कमल कांबळे यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्री.बागवे म्हणाले “ किरण हा नावाप्रमाणेच गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आशेचा किरण आहे त्याने कोरोना काळात जातपात न पाहता केलेले समाजकार्य कोणीही विसरू शकत नाही त्याच्या कार्याने इतरांनीही प्रेरणा मिळते. त्याने व त्याच्या पत्नीचे चालु असलेले समाजकार्य त्या उभयतांनी अविरत चालु ठेवावे अशा निस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्यांची गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आणि समाज्याला गरज आहे.
या कार्यक्रमास मातंग एकता आंदोलन तसेच महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री मा रमेश दादा बागवे,माजी नगरसेवक अविनाश बागवे , विठ्ठल थोरात, सुरेखाताई खंडाळे, अनिल गवळी महानगरपालिकचे अधिकारी विजयकुमार वाघमोडे, राजु दुल्लम, धनंजय नवले यांचेसह लिना लोंढे,स्वामिनी लोंढे,सुरेख लोखंडे,कान्होजी जेधे, रोहित लोंढे,अभि पवार,रणजीत मोहिते, रमाकांत लोंढे, दत्तू पवार,आम्ही कोंढजकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू गवळी यांनी केले तर आभार अभिनेते सुजित रणदिवे यांनी मानले.