
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा – सोमवार दि.8/8/2022 रोजी सकाळी मौलाना अबुलकलाम आझाद हायस्कूल व
सुरैया अली कौचाली ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, येथील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पांगळोली गावांमध्ये जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा व ज्यु कॉलेज यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली या वेळी कॉलेज व शाळेचे विद्यार्थ्याने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते
खरसई येथील रा जि प शाळा व न्यू इंग्लिश स्कुल खरसई च्या वतीने गावात जण जागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या न्यू इंग्लिश स्कुल खरसई चे मुख्याध्यापक, मा. गणी मुलांनी, श्री व्ही. व्ही. सातपुते, श्री, नितीन पाटील, श्री पयेर सर उपस्थित होते.