
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
केंद्रीय संचार ब्युरोच्या अमरावती क्षेत्रीय कार्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे अकोला गावात होणार जनजागृती
अकोलान :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. हे अभियान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते आज या रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरोचे अमरावती क्षेत्रीय कार्यालय, केंद्र सरकारची धोरणे आणि योजनांचा प्रचार करण्याचे काम करते. घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी भारत सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
हा चित्ररथ अकोला शहर, पातूर, बाळापूर, बार्शी टाकळी या तालुक्यात फिरणार आहे. हा चित्ररथ लोकांना तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करेल तसेच तिरंग्याचा आदर ठेवण्याविषयीची माहिती सामायिक करेल. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी नीलेश आपार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव इत्यादी उपस्थित होते.