
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
पुणे (जिल्हा ) शिंदेवाडी गावच्या पोलीस पाटील सौ.उषाताई ताई शिंदे यांची पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये व शिंदेवाडी नगरी मध्ये व परिसरांमध्ये कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस पाटील म्हणून त्यांची चांगलीच ओळख झाली आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सौ.उषाताई शिंदे या नेहमीच आपल्या शिंदेवाडी गावच्या नगरीमध्ये व परिसरांमध्ये त्यांची कामगिरी ही उत्कृंष्टच ठरत आहे. सौ.उषाताई शिंदे यांनी कोरोना काळात तसेच बकरी ईद,शिवजयंती यांसारख्या सण उत्सवांमध्ये सौ.उषाताई शिंदे यांनी उत्कृंष्ट कामगिरी करत पोलीस दलाला चांगलेच नेहमीच त्यांचे सहकार्य लाभते. त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल आळेफाटा पोलीस ठाण्यांमध्ये सेवा उत्कृंष्ट पुरस्कार देवुन गौरविण्यांत आले. यावेळी माननीय पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे,आळेफाटा पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या उपस्थिंत प्रशासकीय पत्रक देवुन सौ. उषाताई शिंदे यांना गौरविण्यांत आले.