
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन टीम कडून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांच्यावर सर्प जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत काल श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज नसरापूर चेलाडी तालुका भोर, जिल्हा पुणे या शाळेत २०० विद्यार्थ्यांसाठी “सर्प जनजागृती कार्यशाळा” घेण्यात आली. प्रचंड उत्साहात या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे २ ऑगस्ट रोजी झालेल्या नागपंचमीच्या सणाला या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साप, नाग, घोणस यांच्या मातीच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. त्यामुळे या बालमित्रांनी भरपूर प्रश्न विचारून आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या शालेय वयातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सापांच्या बद्दल बरीच माहिती होती.
हि कार्यशाळा घेण्यासाठी श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज नसरापूर चेलाडी, भोर या शैक्षणिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाफाळे पी.एन सर ,पर्यवेक्षक श्री खोपडे सर ,धेंडे सर , सुञसंचालन करणा-या गोवेकर मॅडम, पुजारी मॅडम ,शिरसाठ सर आणि आभार प्रदर्शन श्री पुणेकर सर यांनी केले तसेच या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. नसरापूर वन विभागाचे मा. वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव, वनपाल नसरापूर नितीन खताळ , वनपाल कीकवी शाबुदिन शेख, वनपाल संगमनेर अरूण डाळ व वनरक्षक बी. एस. तांबे, भगवान तांबे, एन.एस.पगडे, अक्षय लव्हाळे, संध्या कांबळे, शितल साठे , संतोष भोरडे सहकार्य लाभले
या कार्यशाळेसाठी पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा विभुते , नसरापूर शहर अध्यक्ष श्रीकांत उर्फ सोनू खेडेकर , सनी कडके, विशाल शिंदे, स्वप्नील शिंदे, विलास धोंगडे, दीपक जाधव, विनायक मोहिते, संतोष पाटील, रोहन कोळी, साहिल गुतेदार, राहुल मालुसरे, विष्णु बोकफोडे, उषा लोहार उपस्थित होते. पावसाळयात साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी व पूर्ण माहितीशिवाय कोणत्याही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये व साप चावल्यावर अघोरी उपाय करण्यात वेळ न घालवता त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल होऊन पुढील उपचार घ्यावेत असे आवाहन पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन च्या टीमने शिक्षक, पालक, विध्यार्थी, यांना केले आहे.