
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर,
पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकली आहे. परंतु राष्ट्रवादीकडून आरोप सुरू असल्याने शहर भाजपा पुरती घायाळ झाल्याचे चित्र आहे. त्यातच शनिवारी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने भाजपला टार्गेट केल्यामुळे भाजप बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची २००२ ते २०१७ या पंधरा वर्षांच्या कालावधीत एकहाती सत्ता होती. या सत्तेला पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीत असलेल्या मात्र मोदी लाटेत भाजपवासी झालेल्या नेत्यांनी सुरूंग लावत २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला महापालिकेच्या सत्तेतून हद्दपार केले. स्थानिक, बाहेरचा हा मुद्दा तसेच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर प्रहार करत तब्बल ७७ नगरसेवक निवडून आणले होते.
अति आत्मविश्वासात असलेल्या राष्ट्रवादीला हा पराभव पचविणे जास्तच जड गेले होते.त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. २०२२ च्या महापालिका निवडणूकाही होत आहेत.