
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : आनंद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फिडे या संघटनेचे उपाध्यक्ष बनले आहेत.
तसेच संस्थेच्या अध्यक्षपदी रूसचे आर्केडी वोर्कोविच पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत.
आर्केडी वोर्कोविच यांना एकूण १५७ मते मिळाले, ज्याच्या जोरावर त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवता आले. त्यांचे विरोधक एंड्री बेरिशपोलेट्स यांना अवघ्या १६ मतांवर समाधान मानावे लागले. मतदानप्रक्रियेत एक मत अवैध ठरवले गेले, तर ५ सदस्यांनी मतदान केले नाही. 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड दरम्यान आयोजित जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे (FIDE ) काँग्रेस दरम्यान या निवडणुका झाल्या.
विश्वचनाथन आनंद यांच्या कारकिर्दीचा विचार केला, जागतिक कनिष्ठ स्पर्धेत विजितेपद जिंकल्यानंतर ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते भारताचे प्रतिनिधित्व करत राहिले. त्यांनी भारतासाठी एकून पाच विजेतेपद जिंकले. त्यांनी २०१७ मध्ये देशासाठी शेवटचे विजेतेपद पटकावले होते. सध्या ते बिद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये सहभागी नव्हते, पण संघाला मार्गदर्शन करत राहिले आहेत. फिडेचे अध्यक्ष बनलेल्या वोर्कोविचने निवडणुकीच्या आधी आनंद त्यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते.
वोर्कोविचने सांगितले होते की, भारतीय दिग्गज आधीपासूनच जगभरात खूप प्रसिद्ध आहे. फक्त भारतच नाही, तर ते जिथे कुठे जातात आनंदच्या व्यक्तिमत्व आणि योगदानाची चर्चा होत असते. फिडेचा इतिहास आणि फिडेचे भविष्याच्या दृष्टीने त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते. आमच्याकडे खरच एक चांगला संघ आहे. वोर्केविचने सांगितल्याप्रमाणे त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की, आनंद यांनी फिडेच्या उपाध्यक्षपदासाठी दावेदारी सिद्ध केली.