
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली ‘रानबाजार’ वेब सिरिज आणि ‘वाय’ सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तसेच चाहत्यांशी संवादही साधत असते. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण आज तिच्या आयुष्यात आनंदाचा दिवस आहे. प्राजक्ताचा आज 33 वा वाढदिवस आहे. सर्वत्र तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच निमित्ताने तिच्या ‘रानबाजार’ वेब सिरिज मधील एक भन्नाट किस्सा आम्ही सांगणार आहोत.
काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठी निर्मित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित प्राजक्ता माळीची ‘रानबाजार’ वेब सिरीज रिलीज झाली होती. यामध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड रूप पाहून त्यांना खूप ट्रॉल केले गेले. या सिरिज मध्ये प्राजक्ताने वेश्येची भूमिका केली होती. या भूमिकेबाबत अनेकांनी चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या पण आपण जे केलंय, त्या बाबत मात्र प्राजक्ता ठाम होती. या सिरिज मध्ये एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं, ते म्हणजे ”कुंडी लगाले सय्या, तुम्हारेको जन्नत दिखाती मै..’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं, आजही ते ऐकलं जातंय. पण गंमत खरी वेगळी आहे.