
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून विराटने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही.
2021 च्या त
टी 20 विश्वचषकानंतर त्याने प्रथम टी 20 संघाचे कर्णधारपद सोडले, त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लाराने विराटचा फॉर्म आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती देण्यात आली होती आणि तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचा भाग नव्हता. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आल्याने विराट आशिया चषकासह संघात पुनरागमन करेल असे म्हटले जात आहे.
“मी विराट कोहलीचा एक खेळाडू म्हणून अतिशय आदर करतो. परंतु तुम्ही पाहाल तो यापेक्षाही चांगला खेळाडू म्हणून पुनरागमन करेल. तो सध्याच्या गोष्टींपासून खुप काही शिकेल. त्याचा खेळ संपला असे तुम्ही म्हणू शकत नाही,” असे लारा स्पोर्ट्स जर्नलिस्ट विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. यापूर्वी विराट कोहलीच्या समर्थनार्थ रिकी पाँटिंगनदेखील आपलं मत व्यक्त केलं होतं.
विराटनंतर रोहित शर्माकडे तिन्ही फॉर्मेटच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ण्रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहितबाबत लारा म्हणाला, ‘तो एक जबरदस्त खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाकडे अनेक आक्रमक खेळाडू आहेत, असे मला वाटते. रोहित उत्कृष्ट खेळाडू आहे, असेही तो म्हणाला.