
दैनिक चालू वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी-इंद्रसिंग वसावे
तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळा व आरोग्य सांभाळा
खादय पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल हे फक्त एकदाच तळण्यासाठी वापरले जावे , त्यानंतर ते पुढील दोन दिवसात भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरून संपवावे , जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते . मुख्यत्वे सवे वयोगटातील लोकांना तळलेले पदार्थ हे आकर्षित करतात . मुख्यत्वे कचोरी , समोसा , भजे , वडै , पाणीपुरी यासारखे अन्न पदार्थाची आपल्याकडे सकाळ संध्याकाळी प्रचंडमागणी असते , व हे खादयपदार्थ आपल्याकडे सहज उपलब्ध असतात . परंतू हे खादय पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणा – या तेल त्याचा दर्जा आपण कधी विचार करतच नाही . जर अन्न पदार्थ तळण्याकरीता वापरले जाणारे तेल हे पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरले गेले तर त्यामध्ये पोलर कंपाऊंडस व bad cholesterol ट्रॉन्सफटचे प्रमाण वाढून त्यापासून आपणना हृदयविकाराचा तसेच कोलोन कॅन्सरचा धोका असतो . तसेच पंचनसंस्थेसंबंधी विकार उदभवण्याचा धोका असतो .याकरीता खादयतेल पुनर्वापराबाबत आपण पुढील काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे . असे आवाहन अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य , प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे . १. खादयतेलाचा तळण्यासाटी वापर करतांना गॅस हा कमी आचेवर ठेवा म्हणजेच तेलामधून धूर येणार नाही . याची काळजी घ्यावी . २. तळण्यासाठी शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांडयांचा वापर करावा . लोखंडी कढईचा वापर टाळावा . ३. तळतांना तेलात जमा झालेले अन्न कण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वीच लगेचच काढावेत . ४. तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा . ५. शिल्लकराहिलेले तेल हे पुढील दोन दिवसातच भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरुन संपवावे . हे झाले घरगुती वापराविषयी , तसेच छोटे अन्न व्यवसायिक यांचेविषयी परंतू जे काही मोठे अन्नू व्यवसायिक आहेत ज्यांच्याकडे वेफर्स , शेव फरसाण इत्यादी यांचे उत्पादन व पॅकिंग होते अशा अन्न व्यासायिकांसाठी म्हणजे ज्यांचा तेलाचा वापर प्रतिदिन ५० लिटरपेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन या विभागामार्फत राबविल्या जाणा या अन्न सुरक्षा व मानके कायदयातर्गत काही नियम आहेत . जसे की , वर नमुद मोठयाय अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणा – या तेलाचा रेकार्ड ठेवणे आवश्यक आहे . तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले , शिल्लक राहिलेले तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या रजिस्टर्ड बायेडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे . तसे न केल्यास त्यांचेवरव दंडात्मक कारवाईची तरतूद आहे . त्याचप्रमाणे तळण्यासाठीचे खादयतेलाचा पुर्खापर निबध घालणेसाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन यांचा जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जावून तपासणी करण्यात येते व टीपीसी मीटरच्या साहयाने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी करून जर TPC हे २५ % च्या जास्त असेल तर अन्नू व्यावसायिकांवर पुढील कायदेशिर कारवाईस पात्र ठरतात .
( संतोष .कृ.कांबळे ) सहायक आयुक्त ( अन्न ) , अन्न व औषध प्रशासन , महाराष्ट्र राज्य , नंदुरबार