
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा : – बोरगाव ( अकनाक ) येथे अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेला मोहरम सण हा हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक ठरले आहे. बोरगांवमधील दर्ग्यात हिंदू – मुस्लिम एकत्र येऊन हा मोहरमचा सण आजही परंपरेनुसार साजरा करत आहेत या सणाला सर्वांच्या साह्याने दुल्हा खेळत गावभर सवाऱ्यांची मिरवणुक काढली जाते.
मोहरम हा सण परंपरागत विशेष म्हणजे शिवकालापासुन हिंदू – मुस्लिम एकञीत येऊन साजरा करतात विशेष म्हणजे मोहरममध्ये हिंदू महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होता. व पुजा विधी पुर्ण करतात.
बोरगाव परीसरात मोहरम सणासाठी पांगरी , सोनमांजरी आडगाव विविध ठिकाणीहुन हिंदू लोक पुजा विधी व दर्शनासाठी येतात .
या सणानिमित्त बोरगाव येथील पुंडलिक पाटील बोरगांवकर व त्यांच्या अर्धांगिनी जयश्री पुंडलीक पाटील बोरगांवकर यांनी दर्ग्यात सय्यद सादादचे येथे चादर चढवुन कुटुंबासह दर्शन घेतले. व बोरगांव येथील हिंदू – मुस्लिम बांधवांच्या वतीने मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला