
दैनिक चालू वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधी- माणिक सूर्यवंशी
मा. मुख्य कार्यकारी महोदय यांच्या सूचनेनुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी दि. 09 ऑगस्ट 2022 रोजी मंगळवारी क्रांती दिनी
जि. प. हा. खानापुर ता देगलुर येथील शाळेत मानवी साखळी तयार करून यांमधून एकात्मतेची भावना निर्माण होईल. यावेळी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला. खानापुर बस स्टॉप मेन रोड वर एकमेकांच्या हातात हात घेऊन मानवी साखळी तयार करण्यात आली. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मानवी साखळी मुलांची, मुलींची स्वतंत्र मानवी साखळी करण्यात आली.भारत माता की जय,वंदे मातरम्,हम सब एक है च्या घोषणा देत हातात तिरंगा झेंडा घेऊन “घरोघरी तिरंगा लावू,भारत गीते आपण गाऊ”अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी मुख्याध्यापक श्री गज्जलवार सर,श्री. श्री.शिरामे सर, श्री.विधमवार सर, श्री बल्लाळ सर , श्री.अक्कमोड सर,सौ. साळुंके मॅडम, सौ.कबीर मॅडम सौ.पाटील मॅडम व सांस्कृतिक प्रमुख श्री कदम सर, अक्येमवार मामा…………….
यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
जय हिंद..
भारत माता की जय….