
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : पुरातून जाण्याचे धाडस दोन तरुणांना चांगलंच जीवावर बेतलं आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे परिसरातील गुळुंचवाडी येथील ओढ्याला पूर आला होता. पूर आलेला असताना देखील दोन तरुणांनी या पुरातून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा होता की, या पुरात दोघेही तरुण दुचाकीसह वाहून गेले आहेत. मात्र त्यांचे नशीब चांगले म्हणून काही अंतरावर गेल्यावर ते पाण्याच्या प्रवाहाने बाहेर फेकले गेले व सुदैवाने त्यांचे प्राण थोडक्यात वाचले.
सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी मुसळधार सुरू आहे. त्यामुळे अनेकजण पाण्यामध्ये उरतरुन किंवा नको त्या गोष्टींचा अतिरेक करत स्टंट करताना पहायला मिळत आहेत. पूर्वी त्यात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. म्हणून असे मूर्खपणाचे धाडस न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.