
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
संयुक्त उत्सव कमिटी व भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त
मंगळवार दि.९ऑगस्ट रोजी वाड्यातील खंडेस्वरी नाका येथे आदिवासी क्रांतिवीर, थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून, पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. खंडेस्वरी नाक्याहुन पंचायत समिती कार्यालया पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली
यावेळी नायब तहसिलदार अनिल लहांगे, पोलीस अधिकारी व इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
खंडेश्वरी नाका ते तहसील कार्यलया पर्यंतच्या रॅलीमध्ये सांगड नृत्य, तारपा नृत्य व विविध पारंपरिक वेषभूषा धारण करून वाजत, गाजत, नाचत रॅली काढण्यात आली तर पंचायत समितीच्या समोर असलेल्या संविधान स्तंभाचे पूजन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.याप्रसंगी तहसीलदार डॉ. उद्धव कदम, पोलीस निरीक्षक दशरथ पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते त्यांचासाठी अल्पोपहाराची सोय जिजाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.