
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी वाडा ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनोरंजनाचे कार्यक्रम न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करून काही रुग्णांना जीवनदान देण्याच्या प्रयत्नातून रक्तदान शिबाराचे आयोजन केले असल्याचे संघटनेचे संस्थापक , अध्यक्ष अनंता वणगा यांनी सांगितले.
आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वाडा तालुका कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर रक्तदानासाठी महिलांनीही पुढाकार घेतला होता. या शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्यांची संख्या जास्त होती,रक्तकर्ण प्रा.किरण थोरात यांनी ९४ वे रक्तदान केले.
७५ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती वाडा तालुका अध्यक्ष दयानंद हरळ यांनी दिली.
याप्रसंगी रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.