
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
अजिनाथ राऊतांच्या अथक पाठपुराव्याला प्रांत अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी दिला हिरवा सिग्नल
भूम:-उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 अन्वये जानेवारी ते जुलै 2022 या महिन्यात आज अखेरपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला.
भुम उपविभागात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन जातीय सलोखा अबाधित राहुन दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यासाठी भुम येथील उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या अध्यक्षा रोहिणी नऱ्हे यांनी दि 5 आॅगस्ट 2022 रोजी सर्व सदस्यांना निमंत्रित करुन उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी भुमचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख, नायब तहसिलदार एन. एस. पाटील, प्रांत आॅफिसचे, अव्वल कारकून ए. के. कांबळे, श्रीमती सुकाळे मॅडम, एस. पी. पत्तेवाड, सामाजिक कार्यकर्ते तथा नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक ना. ह. स., पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या परीपत्रकांची व शासनाच्या शासन निर्णयांसह अॅट्रोसिटी कायद्यातील विविध तरतुदींची पोलीस प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याच्या तक्रारींचा पाढा उपविभागीय दंडाधिकारी यांचे समोर वाचून दाखवत अॅट्रोसिटी अंतर्गत जातीचा दाखला उपलब्ध नसलेल्या पिडीतांना त्वरीत दाखला देवून त्यांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी केली. उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी चालु वर्षात दाखल झालेल्या व तपासावर प्रलंबित असलेल्या केसेसचा आढावा घेऊन कायद्यात नमुद असलेल्या सखोल तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश भुम येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांना दिले तर बैठकीस उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांवर कारवाई करणार असल्याचेही उपविभागीय दंडाधिकारी नऱ्हे यांनी यावेळी सांगीतले. तसेच बैठकी दरम्यान अॅट्रोसिटी अंतर्गत पिडीतांना येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणींसह सर्व जाती धर्माच्या नागरीकांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
चौकट; भुम उपविभागाला उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे या अतिशय कर्तव्यदक्ष व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करुन समस्या सोडवणाऱ्या अधिकारी लाभल्याने नागरीकांतून ऐकायला मिळत असुन त्यांच्या कामावर समाधान व्यक्त केले जात आहे.