दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी – दत्तात्रय वामनराव कराळे
—————————————
परभणी : मागील काही दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील बहतांश धरणे सुखावली आहेत. परन्तु राज्यात कांहीं ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक झाली आहेत. परिणामी शेतकरी वर्गही कमालीचा हवालदिल झाला आहे.
दरम्यान मराठवाड्यातील बहुतांश धरणे सुखावली असल्याने त्यातील बराच पाणीसाठा नजिकच्या काळात धोकादायक ठरला जाऊ नये यासाठी सर्वच धरणांतील कांहीं अंशी साठलेला पाणी साठा विसर्ग केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणाचे तब्बल १८ दरवाजे एक फूट उंच उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी गोदाकाठावर जेवढी गावे वसली आहेत त्यांनी सतर्क राहावे म्हणून त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील लोअर दुधना धरणातून विसर्ग केला जात आहे. झरीसह नदीकाठच्या सर्व गावांना इशारा देऊन सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. तर तिकडे सिद्धेश्वर धरणही पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सध्या तरी केवळ दोनच दरवाजातून पूर्णा नदी पात्रात पाणी सोडले गेले आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, ग्रामस्थ व शेतकरी वर्गांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी सावधान पूर्वक सतर्कता बाळगली जावी यासाठीची पूर्व सूचना देण्यात आली आहे.
