
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
अह.नगर जिल्ह्यांतील कर्जत गावचे सुपुत्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रांच्या परिचयांतील आमचे लाडके परममित्र, आणि गोड, व्यक्तिमत्व समाज प्रबोधनकार महाराष्ट्रांतील युवा आणि विनोदी शैलीतील युवा कीर्तनकार म्हणून त्यांची वारकरी संप्रदायांमध्ये चांगलीच ओळख आहे. ह. भ .प .ज्ञानेश्वर पठाडे महाराजांनी अगदी बालपणापासूनच वारकरी संप्रदायाची सेवा आणि कीर्तन करण्यांचा योग त्यांना चांगलाच आला. कर्जत मध्ये वडिलांनी जेवढी कष्ट करुन तेवढी संपत्ती कमावली आणि मी कीर्तनाच्या मिळणाऱ्या मानधनेतून माझ्या जन्मभूमी कर्जत या ठिकाणी भव्य दिव्य असे माऊली मंदिर उभारले आहे. समाजांमध्ये कीर्तन करीत असताना समाज प्रबोधन करताना समाज परिवर्तन हे अत्यंत महत्त्वांचे आहे. त्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक वर्षाच्या सणावर समाज प्रबोधन माध्यमांतून आपली कीर्तन सेवा समाज पुढे मांडली. यामध्ये छत्रपती शिवाजींचे विचार असो, गणपती बाप्पाचे डोळे बारीक का असतात, सरपंच मीच होणार, गुढीपाडवा हा का साजरा केला जातो, पप्पा मला शेतकरी नवरा नको, अशा विविध विचारांवर तरुण पिढीला प्रोत्साहिंत करीत त्यांनी आपली समाजसेवा कीर्तनांच्या माध्यमांतून अगदी महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविली. ह.भ.प पठाडे महाराजांनी तरुण मुलींसाठी सुद्धा ते नेहमी सांगतात की मुलींनो तुम्ही तुमच्या स्वतांच्या पायावरती भक्कमपणे उभे राबल्याशिवाय पुढील कोणताही निर्णय घ्यायचा नाही .आणि आपल्या आई वडिलांची मान कधीही समाजांमध्ये खाली मान घालायला लावायची नाही.असे आपल्या कीर्तनाच्या माध्यमांतून नेहमीच उपदेश करीत असतात. तसेच माझ्या समाज बांधवांना त्यांचा एक अतिशय आणि अत्यंत महत्त्वांचा विषय म्हणजे लग्न साधी करा सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या मुला मुलींचे लग्न करावे असा ते नेहमीच कीर्तनांच्या माध्यमांतून माझ्या माता,बहिणींना उद्देश करीत असतात. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यातून तसेच वारकरी संप्रदायांतून ह.भ. प. ज्ञानेश्वर पठाडे माऊली महाराजांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. संभाजी गोसावी यांनी महाराजांना सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी श्री.पठाडे महाराजांची संपर्क साधून माऊली आपणांस दीर्घ आयुष्य लाभो व आपल्या हातून देशाची सेवा घडो हीच माय माऊली पांडुरंगाच्या चरणी मी पार्थना करुन महाराज आपणांस वाढदिवसांच्या शुभेच्छा देतो असे श्री. गोसावी यांनी सोशल मीडियावरुन महाराजांशी संपर्क साधत शुभेच्छा व्यक्त केल्या.