
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात क्रांतीदिना निमित्त भव्य अशा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील बी. रघुनाथ सभागृह येथे महानगरपालिका आयोजित या गौरव सोहळ्याचे परभणी लोकसभा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
महापालिका आयुक्त देविदास पवार, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, मनोज गग्गर यांच्या उपस्थितीत संपन्न या सोहळ्यात असंख्य स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षित व बहारदार असे नृत्य सादर करुन आपल्या अंगी असलेली सुप्त कला गुणांची अदाकारी पेश केली.