
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : शिंदे सरकारने महिनाभर रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यामध्ये काही भ्रष्ट व गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार अनोखे आंदोलन केलं..राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातात मंत्र्यांच्या फोटोसह कपडे धुण्याच्या पावडरची पाकिटं होती… तसंच राष्ट्रवादीनं आंदोलनात वॉशिंग मशिन देखील आणली होती.. भाजप ही वॉशिंग मशिन असून, प्रवेश करताच घोटाळ्याचे आरोप असणारे नेते देखील शुद्ध होतात अशी टीका राष्ट्रवादीनं केलीय..