
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –================= . . लोहा सर्वांच्या घरात वापरला जाणारा गॅस महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात लोहा तालुक्यात इंडियन गॅस एजन्सी वाल्यांची सर्व सामान्य कडून लूट दिसून येत आहे काही सिलेंडर चे वजन 30 किलो आणि काही सिलेंडरचे वजन 29.500 असे दिसून येत आहे टाकीवर स्पष्टपणे लिहिलेले आहे की गॅस चे वजन 14.2 अणि टाकीचे वजन 15.8 आसे दोन्ही मिळून 30 किलो भरले पाहिजे तरीही वजन केले असता 29.500 आणि काही टाक्यांची 30 किलो आढळून आले व 500 ग्राम गॅस जातो कुठे हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न काय सर्वसामान्य माणसाची लूट होते की काय असा प्रश्न जनतेत निर्माण होत आहे 500 ग्राम वजन कमी का आहे असे विचारले असता अभिजीत इंडियन गॅस लोहा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले व म्हणाले की आमच्या घरी तयार होत नाही आणि लिकेज असू शकतो आणि अभिजीत इंडियन गॅस लोहा यांच्या गोडाऊनला गॅस सिलेंडर मोजून देण्यासाठी कुठलाही काटा नाही डायरेक्ट सिलेंडर ग्राहकाला देण्यात येत आहे आणि बरोबर असतो त्यात तुम्ही घेऊन जा असे सांगण्यात येत आहे