
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे : आँर्केस्ट्रा जगतातील पुण्यातील पहिली संस्था ‘मेलडी मेकर्स ‘ यांचा ६१ वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात १५ आँगस्ट रोजी पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंच येथे साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेशजी भोसले, पार्श्वगायिका बेलाजी सुलाखे आणि ३० हून अधिक वादकांनी पुन्हा एकदा त्या ‘सुवर्ण काळाचा ‘ रसिकांना पुनः प्रत्यय दिला. खरंतर १९६१ साली पुण्यातील पानशेतच्या पुरानंतर चार मित्रांनी अशोककुमारजी सराफ, प्रमोदकुमारजी सराफ, प्रा.सुहासचंद्र कुलकर्णी, प्रा. सुरेनजी अकोलकर सर एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिला शो केला… आणि त्यानंतर इतिहास घडला… यातून अनेक कलाकार,गायक ,गायिका ,वादक हे मराठी ,हिंदी नाट्य,चित्रपट सृष्टीला मिळाले.. संपूर्ण सराफ परिवाराचा यात सिंहाचा वाटा आहे..आता ही धुरा पुढच्या पिढीतील प्रवीणजी सराफ सांभाळीत आहे. या शो मध्ये भोई प्रतिष्ठानच्या वतीने अशोककुमारजी सराफ, सुदेशजी भोसले, प्रवीणजी सराफ, बेला सुलाखे यांचा पुणेरी पगडी, शाल, उपरणे देऊन डाँ.मिलिंदजी भोई , मा.राजनजी बेडके, इक्बालजी दरबार, माणिकजी बजाज, संतोष चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन पराग चौधरी यांनी केले. अशी माहिती संयोजक संतोष चोरडिया यांनी आज दिली.