
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
३०० लोकांचा जमाव,. पोलीस ठाण्याला घातला घेराव गुन्हा दाखल करा अन्यथा
अंत्यसंस्कार न करण्याचा
निर्धार; नागरिकांचा इशारा
—————————————-
परभणी : युवकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही, असा कमालीचा गोंधळ घालीत सुमारे ३०० लोकांनी जमाव करुन नवा
मोंढा पोलीस ठाण्याला घेराव घातला. अचानक चाल करुन एवढ्या मोठ्या संख्येने आलेला जमाव बघून प्रथमतः काही काळ पोलिसही चक्रावून गेले होते.
परभणीच्या गौतम नगरात राहणारा राजेश भुजंगराव लहाने, वय अंदाजे ४५ वर्षे यास १५ ऑगस्ट रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात एका प्रकरणी बोलावून घेण्यात आले त्यावेळी निर्भया पथकातल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांने राजेशला बेदम मारहाण करीत अर्वाच्य शिवीगाळ सुध्दा केली होती. असा आरोप राजेंचे कुटुंबीय व नातेवाईकांनी केला आहे. परिणामी बदनामी झाल्याचा आघात सहन न होऊन राजेश याने रात्रौ उशीरा २ वाजण्याच्या सुमारास थेट रेल्वे स्थानक गाठले आणि धावत्या गाडीच्या खाली उडी मारुन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप ठेवत राजेशच्या कुटुंबियांनी सदर महिला
पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी लावून धरली.
सुमारे तीनशेच्या संख्येतील जमावाने तीव्र संताप व्यक्त करीत जो पर्यंत गुन्हा दाखल केला जाणार नाही तोपर्यंत मयत राजेशवर अंत्यसंस्कार सुध्दा करणार नाही, जणू असा गर्भित इशाराच दिला. एकूणच झालेल्या या प्रकारामुळे परभणीतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. याप्रकरणी जो पर्यंत वरिष्ठ तातडीने लक्ष घालून कोणत्याही निर्णयाप्रत येणार नाहीत तोपर्यंत परिस्थिती जैसे थे अशीच राहिली जाईल असे वातावरण दिसून येत आहे. किंबहुना या प्रकरणी अधिक विलंब झाला तर मात्र परिस्थिती अधिकच चिघळली जाऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली जाईल की काय, अशीही शंका व्यक्त होत आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी लक्ष घातले असल्याचे बोलले जात आहे. शिवाय या संबंधी असून चौकशी करुन योग्य असा न्य देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासनही दिल्याचे बोलले जात आहे.