दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कराळे . .
लोहा: कृषि विभागाच्या स्मार्ट मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट)प्रकलप (जागतिक बॅक सहाय्यित उपक्रम) आत्मा लोहा अंतर्गत स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत गोविंदप्रभू शेतकरी उत्पादक कंपनी लोढेसांगवी.ता.लोहा. येथे मुल्य साखळी विकास शाळा पिक सोयाबीन शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिक शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे .कृषि विभागाच्या धोरणानुसार सोयाबीन पिकांमध्ये शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील खरीप हंगामात कापुस,पिकासोबत बहुतांश शेतकरी सोयाबीन पीक लागवडीला महत्त्व देतात.यांच अनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने रविशंकर चलवदे प्रकल्प संचालक नांदेड , श्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक , अरुण घुमनवाड स्मार्ट नोडेल अधिकारी नांदेड, यांच्या मार्गदर्शनाखालीआत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी मौजे लोढेसांगवी येथे शेतीशाळेचे आयोजन केले आहे.
स्मार्ट अंतर्गत आयोजन : सोयाबीन पिकाविषयी एकूण पाच सत्र शेतीशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत यामध्ये १) पेरणीपूर्व २) पेरणी व रोपावस्था, ३) शाखीय वाढ व फुलोरावस्था,४)शेंगा लागणे व पक्वता, ५)काढणी व काढणीपश्यात तंत्रज्ञान, प्रतवारी व साठवणूक, प्रक्रिया उद्योग विक्री व्यवस्था याबाबत माहिती दिली जाणार आहे.व आतापर्यत दोन सत्र आयोजित झाले.
आज तिसऱ्या सत्रामध्ये विविध पिकांवरील किड रोगांचे व्यवस्थापन , एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन, खोडमाशी,चक्रीभुगां, तंबाखूवरील पाने खाणारी अळी,
व विविध मित्रकीटक, कामगंध सापळे उपयोग व व्यवस्थापन या विषयी सोयाबीन शेतीशाळे वर्गात माहिती देण्यात आली.
शेतीशाळेत निवडलेले शेतकर्यांचे सभेत शेतीशाळेचा उद्देश, सोयाबीन उत्पादनात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणी या विषयावर शेतीशाळा प्रशिक्षक मन्मथ गवळी, यांनी शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.राजेंद्र कदम नोडेल अधिकारी विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष विभाग स्तर लातुर, श्री.बाबासाहेब विर संनियत्रण मुल्यमापन एम.आय.एम तज्ञ. श्री कांबळे ,नोडेल अधिकारी नांदेड अरूण घुमनवाड , श्री.बिराडे आत्माचे सोहेल सय्यद, यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या शेतीशाळा सत्रामध्ये समुह उच्च राष्ट्रगीत घेण्यात आले आहे.
या शेतीशाळेस लोढेसांगवी येथील श्री. डिगांबर लोढे,संदिप लोढे,मुजाजी लोढे इतर शेतकरी व शेतकरी उतपादक कंपनीतील सदस्य उपस्थित होते.
