दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार ग्रा. -बाजीराव गायकवाड
बोरी खुर्द :- कंधार तालुक्यातील उर्मज बोरी खुर्द येथील माजी सैनिक व सैनिक यांनी मिळून गावातील दहावी पास व बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ईयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी वैभव बोरकर, प्रगती जायेभाये, व्यंकटी जायेभाये, गणेश टोकलवाड, कोंडीबा वाघमारे आणि ईयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थी वैष्णवी बोरकर, रुपेश पंदलवाड, रमाकांत जायेभाये, यशोदा पंदलवाड या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी माजी सैनिक व सैनिक संग्राम जायेभाये, उमाजी पंदलवाड, तिरुपती जायेभाये, बळीराम जायेभाये, शिवानंद शिंदे, जनार्दन टोकलवाड, शाहुराज बोरकर, सदाशिव जायेभाये, ज्ञानेश्वर जायेभाये, विनायक जायेभाये या सर्वानी आर्थिक मदत व गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यासाठी परिश्रम घेतले. गावातील नागरिक मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
