दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात सुरू असलेल्या महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी पिंपरी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम राबवण्यात आला. गुरूवारी १८ ऑगस्टपासून दररोज सकाळी १० वाजता पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्यालयात राष्ट्रगीताचे समूहगान झाले. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. देशाची एकात्मता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी निर्धारपूर्वक संकल्प यावेळी करण्यात आला. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पदाधिकारी मनोज माछरे, उमेश बांदल आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आता पालिकेच्या सर्व कार्यालयांत दररोज सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत वाजणार आहे.-न्यूज नेटवर्क
