
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – तालुक्यातील कलंबर खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा संपन्न झाली. तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार इच्छुक होते . त्यामध्ये माधव पा पवार , गंगाधर घोरबांड , तिरूपती घोरबांड , विठ्ठल बोईनवाड , विलास घोरबांड , त्यापैकी माधव पा पवार यांनी माघार घेतली. चार उमेदवारांमध्ये कलंबरच्या तंटामुक्त अध्यक्षपदासाठी लढत झाली या लढतींमध्ये सामाजिक कार्यकर्ते विलास पा घोरबांड यांचा दणदणीत विजय झाला.
कलंबर खुर्दच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विलास पा घोरबांड यांची निवड करण्यात आली यावेळी त्याना प्रत्यक्ष गणेशराव घोरबांड सह गावकरी मंडळीनी व सोशल मिडियाच्या माध्यमातून पण शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.