
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
46 वर्षापासून सुरू असलेली ही अखंड परंपरा
भूम:- तालुक्यातील मौजे आष्टा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहामध्ये सांगता झाली. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत व त्यांची कीर्तने संपन्न झाली यामध्ये ह भ प दत्तात्रय महाराज ओके, ह भ प हरिदास महाराज शिंदे, सोलापूरकर ह भ प बाल, कीर्तनकार कपिलेश्वर महाराज काळे, लातूर ह भ प गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे हासेगावकर, ह भ प गाथा मूर्ती देवेंद्र महाराज निंबाळकर, ह भ प गुरुवर्य शारंगधर महाराज मेहुणकर, ह भ प गुरुवर्य प्रभाकर दादा महाराज वाकचौरे, सोलापूर ह भ प गुरुवर्य वेदांत वाचस्पती ,डॉ जयवंत महाराज बोधले, व ह भ प गुरुवर्य सुधाकर महाराज मेहुणकर या सर्व मान्यवरांची कीर्तने संपन्न झाली. दहीहंडी उत्सवाने सप्ताहाचे सांगता करण्यात आली .या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 46 वर्षापासून सुरू असलेली ही अखंड परंपरा आबादीतपणाने आजही तितक्याच उत्साहात आणि आनंदात गावकरी व सर्व गावातील तरुण मंडळी मोठ्या श्रद्धेने जोपासतात आदिशक्ती मुक्ताबाई आणि श्री गुरु धोंडोपंत दादा साहेब यांच्या परंपरेतील हे गाव सामाजिक कार्यामध्ये आणि सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण आपल्या लौकिकाला साजेल असे कार्य करण्यामध्ये कधीही मागे नसते या गावचे वैशिष्ट्ये अजून एक गावामध्ये सांप्रदायिक लोकांमुळे राजकीय सलोखा खूप स्नेहाचा असतो म्हणून गावातील अनेक विकास कामांना सप्ताहामध्ये सुद्धा चर्चात्मक गती येते.
यावेळी आष्टा ग्रामस्थ उपस्थित होते.