
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा – गोदावरी इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी व गोपाळकाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मुलांनी श्री कृष्णाच्या वेगवेगळ्या गाण्यावर आनंदाने नृत्य केले. श्रीकृष्ण – राधा, सुदामा, पेंद्या अश्या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुले एकमेकांकडे कुतूहलाने पाहत होती. यावेळी दहीहंडी उत्सवामध्ये शाळेचे विद्यार्थी राधा,कृष्ण,गोपिका, कृष्णाचे सवंगडी,पेंद्या अशा वेष परिधान करून आले होते. शाळेतील मुले अगदी रिंगण करून कृष्णराधाला मध्ये घेऊवन टाळ्यांच्या गोड तालावर तहान भूक हरुवन दहीहंडीचा आनंद घेता होते. शाळेचे संचालक शिवशंकर वानखेडे सर यांनी दही हंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेत गोड मेजवाणीचे आयोजन पण केले होते.
या कार्यक्रमाला विशेष आकर्षण आणण्यासाठी उपक्रमशील प्रिंसिपल डेरे मिस, सहकारी विजया मिस, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुजा मिस व यांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.
या वेळी संचालक प्रा. शिवशंकर वानखेडे यांनी गोपाळकाला करण्यामागील उद्देश हा गोकुळ व मथुरामधील बालगोपाळाना आवडेल अशा पद्धतीने सांगितला.
श्रीकृष्णाचे मित्र सामान्य कुटुंबातले असल्यामुळे त्यांच्या घरून येणारे जे पदार्थ होते ते अगदी साधे असायचे. नुसता भात, चटणी, ठेसा भाकरी, तर दही ताक आणायचे सांगण्याचा मुद्दा असा श्रीकृष्णाचे मित्र हे अतिशय गरीब असल्याने कृष्णाने आपल्या आईने दिलेली पकवान स्वतः खाणे योग्य नाही व सर्वजण जात, धर्म विसरून एकत्र यावे या भावनेतून गोपाळ काल्याची निर्मिती झाली हा प्रसंग सरांनी चिमुकल्यांच्या मनावर रुजवण्याचे काम गोदावरी इंग्लिशच्या दहीहंडीच्या माध्यमातून केला या कार्यक्रमाचे पालक वर्गातून स्वागत करण्यात आले