दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार -बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील पांगरा,संगुचीवाडी, उस्माननगर तसेच लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री. छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे जंगी स्वागत करुन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी भोपाळवाडी परीसरातील मराठा बांधवांनी निवेदन दिले. मराठा समाजाचे आ. विनायक मेटे साहेब यांच्या निधनामुळे मराठा समाजाला मोठे दु:ख झाले आहे. कारण त्यांच्या सारखे नेतृत्व हरवल्यामुळे मराठा समाज पोरका झाला आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी मेटे साहेबांच्या पत्नीला आमदार करून ही पोकळी भरून काढा अशी मागणी मराठा समाजाने श्री. छत्रपती संभाजी राजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते.
