
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
============================
महाराष्ट्र राज्यांचे कृषीमंत्री मा. अब्दुल सत्तार साहेब यांचे पळसा येथे स्वागत करून मा. श्री सुभाषराव राठोड ( मा. उपसभापती कृ.उ.बा.समीती हदगाव संचालक खरेदी विक्री संघ हदगाव ) मा. श्री कुबेर राठोड ( महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्यकारिणी सदस्य मुंबई ) रामभाउ लाहोटी गारगवान चे सरपंच रंजीत वाढवे गारगवान किनाळा पळसा सह हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने शेतकरी बांधवांनी पेरलेले संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी व ओला दुष्काळ जाहिर करावा.व गारगवान किनाळा पळसा येथील सर्व पांदन रस्ते मजबूत करण्यासाठी आणि पळसा येथील सार्वजनिक स्मशानभूमी साठी लागणारा निधी तात्काळ देण्यात यावा. कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी सदरील सर्व मागण्यांचे निवेदन स्विकारून आपल्या मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येथिल असे सरपंच व शेतकरी बांधवांना व उपस्थीताना त्यांनी आश्वासन दिले आहे.