दैनिक चालु वार्ता वृतसेवा-
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
या संदर्भातील सुनावणी उद्या होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं समजतं. तसेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण करणही पुढं आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची होणारी सुनावणी आता उद्या होणार नसून परवा होणार आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तिसरे न्यायमूर्ती उपस्थित नसल्यामुळं सुनावणी पुढे ढकलल्याचं समोर आलं आहे.