
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दि. 20 ऑगस्ट 2022 रोजी सार्वजनिक वाचनालय येथे झालेल्या लायन्स क्लब आयोजित देशभक्ती समूह गीत स्पर्धेत सनीज स्प्रिंग डेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट समूहगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला समूहगीतामध्ये विद्यार्थी अभीर पांडे स्वरांश मोहरील समीर मुदलियार श्लोक गोमासे स्पर्श गजभिये अंशुल दमाहे मानस जैन लेखांश वंजारी अभीराम कुलकर्णी प्रज्वल मानकर हे होते तसेच हार्मोनियम वर शाळेतील संगीत शिक्षक विनोद बोरकर व तबला वादक अभिषेक रामटेके होते विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे संचालक श्री सुनील मेंढे प्राचार्य शेफाली पाल कल्पना जांगडे समृद्धी गंगाखेडकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत