
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पात्र संस्था
शासकीय विभाग, शासनामार्फत होणारी क्रीडा संकुले, स्थानिक स्वराज्य संस्था यांना १०० टक्के अनुदान, स्वहिस्सा आवश्यक नाही.
आदिवासी भागातील खाजगी संस्थांना जास्तीत जास्त ७ लाख रुपये किंवा अंदाजित खर्चाच्या ९० टक्के अनुदान.
अनुदान मर्यादा
क्रीडांगण विकासासाठी जास्तीत जास्त ७ लाख रुपये किंवा अंदाजित खर्चाच्या ७५ टक्के.
क्रीडा साहित्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपये.
क्रीडांगण अनुदानासाठी निर्माण करावयाच्या आवश्यक सुविधा, बाबी
क्रीडांगण समपातळीत करणे
२०० मीटर, ४०० मीटर धावन पथ
क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण
विविध खेळाचे एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे
प्रसाधनगृह, चेजिंग रुम
पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा
क्रीडा साहित्याची खरेदी व साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह
क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा
मातीचा/ सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षकगृह/ आसन व्यवस्था
प्रेक्षकगृह / आसन व्यवस्थेवर छत
क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था
निर्मित सुविधांच्या अनुषंगाने मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा
मैदानावर रोलिंग करण्यासाठी मिनी रोलरची खरेदी
संपर्क:- जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे-६, dsopune6@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.