
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील मौजे बनकरवाडी या ठिकाणी रविवार दिनांक २१/८/२०२२ रोजी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी एक दिवस अगोदरच संपूर्ण गावातून गणेश मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. रविवारी या मूर्तीची स्थापना सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बनकरवाडी तसेच पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी आठ ते दहा या वेळेत ह.भ.प.बुवासाहेब महाराज करे यांचे कीर्तन झाले.यावेळी श्री संत सावतामाळी भजनी मंडळ बनकरवाडी व आजूबाजूच्या गावातील भजनी मंडळ, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले ग्रुप बनकरवाडी व गावातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.