
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:मतदारांची सध्याची मनस्थिती पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला जनता वैतागली असल्याचे चित्र दिसत असल्याने देगलूर येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील अनेक महिन्यापासून चलबिचल सुरु आहे. लवकरच हे पदाधिकारी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत देगलूर नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा दावा निवडणूक प्रभारी रामदास पाटील यांनी केला.
देगलूर नगरपालिका सध्या काँग्रेसच्या ताब्यातकाही काँग्रेस नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. हा नाराज गट तिसरी आघाडी करुन भाजपाला पाठींबा देण्याची शक्यता असून तशी चाचपणी सुरु असल्याचे वृत्त आहे. केवळ काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
सध्या देगलूर निवडणुक प्रभारी म्हणून रामदास पाटील, सुभाष साबणे, लक्ष्मण ठकरवाड यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून अत्यंत सुक्ष्म नियोजन चालू आहे. लाभार्थी आणि पारदर्शी विकास हा अजेंडा भाजपाचा असल्याने मतदार भाजपाकडेआकर्षित होत आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलो असल्याची बाब जनता जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्षातील पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे भाजपा नगरपालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी खा. प्रताप पा. चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकट पा. गोजेगावकर, निवडुक प्रभारी रामदास पाटील, माजी आ. सुभाष साबणे, माजी नगराध्यक्ष गंगाधर जोशी, सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, मारोती वाडेकर आणि स्थानिक पदाधिकारी तयारीलालागले आहेत.