
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर. : – घरचा सर्व प्रपंच व आपली डॉक्टरकी सोडून समाजाचे भलं करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर हे स्वतः घराबाहेर पडून कोणत्याही धमक्याला न घाबरता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून गावागावामध्ये चळवळ उभा करून ज्ञान आणि विज्ञानासाठी शहीद झालेला पहिला माणूस म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके यांनी केले. ते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आठवणीतील दाभोळकर या विषयी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिस अध्यक्ष डॉ. धीरज देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेब होते. प्रमुख उपस्थितीत सत्यभाऊ काळे, प्रा.रत्नाकर नळेगावकर, मेघराज गायकवाड , अशोक चपटे , प्रा. नाना कदम, डॉ सतीश ससाने,,ज्ञानोबा भोसले , सतीश पाटील, शेषेराव ससाने ,वाजिद शेख ,मोहम्मद नाझीम, अंतेश्वर धुमाळ ,अजहर बागवान, जावेद बागवान ,वीरेंद्र पवार ,अभिजीत माने, राम सुयर्वंशी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना शेळके म्हणाले की, दाभोळकर यांच्या खुनाला पूर्ण नववर्ष होऊन देखील त्यांचे आरोपी अजून आपण अटक करत नाही .ही कुठेतरी शरमेची बाब आहे . आणि समाज सुधारकांची हत्या होणे म्हणजे हे काही नवीन बाब नाही.अनंत काळापासून चालत आलेली आहे.जे कोणी समाज उन्नतीकडे नेण्याचे काम करत आहे. त्यांच्या हत्या होतच असतात या त्याला न घाबरता अनिसच्या कार्याच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते समाज सुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम ते मोठ्या जोमान करत आहेत.भोंदू बाबा वर आळ बसण्यासाठी कायदा झाला पाहिजे. विज्ञानाचा पताका घेऊन स्वतःचा बळी देणारा हा पहिला शहीद व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिला जातो. त्यांनी अतिशय प्रखड आपले विचार व्यक्त केले .
शहीद दाभोळकरांनी विचाराचे मतभेद बाजूला सारून दूरदृष्टीचा हा कार्यकर्ता एक सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला हमीद दलवाई यांच्या निधनानंतर आपल्या स्वतःच्या मुलाचे नाव ठेवतात हमीद ही कल्पकता सोपी नाही .घरचा सर्व प्रपंच आपली डॉक्टरकि सोडून समाजाचे भलं करण्यासाठी हा माणूस घराबाहेर पडतो.कोणत्याही धमक्याला न घाबरता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून गावागावामध्ये चळवळ उभा करतो.आज साडेतीनशे शाखेच्या वर या शाखेच्या माध्यमातून मि दाभोळकर म्हणून प्रत्येक जण जीवाची परवा न करता काम करत आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताताविक राम तत्तापुरे तर आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले. यावेळी सामाजिक व विविध परिवर्तनवादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.