दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
गुणवत्ता कोणाची मुक्तेदारी नसुन आतापर्यंत नापास झालेल्यांनीच जगात इतिहास घडविला आहे . विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विज्ञानवादी बनले पाहिजे असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ .श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी केले . श्रीपतराव चौगुले आर्टस ,सायन्स कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ .के.एस. चौगुले होते .
श्रीमंत कोकाटे म्हणाले , विद्यार्थांचे खरे हिरो हे देशाचे रक्षण करणारे असले पाहिजेत .स्वतःला कमी लेखू नका .संकटाला सामोरे जाऊन हीच खरी संधी समजावी . मुलीगी हीच खरी वंशवर्धक असून स्त्रीमध्येच नवनिर्मिती क्षमता जास्त असते . ग्रामिण भागातील मुलीना उच्च शिक्षणाची सोय केल्यामुळे डॉ .के.एस. चौगुले यांचे उपकार असल्याचे त्यांनी सांगितले .आहार आणि धर्माचा संबंध नसून आहारातील अंधश्रद्धा दूर करा . राशीभविष्य थोतांड असून दिशा या काल्पनिक आहेत .दुसरे प्रमुख पाहुणे संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले आई वडील हे आपले दैवत असून त्यांचा सन्मान करा . आजच्या युवकामध्ये खऱ्या इतिहासाविषयी जनजागृती करणे हा खरा उद्देश संभाजी बिग्रेडचा असल्याचे त्यांनी सांगितले . अध्यक्षस्थानी बोलताना डॉ .के. एस . चौगुले म्हणाले , विद्यार्थ्यानी आपली प्रगती स्वता करायची आहे त्यासाठी जीद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याचे आवाहन केले .
कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालुन केले . प्रा .रवि पाटील यांनी देशभक्तीपर गीत गायले . या वेळी प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेच्या संचालिका सौ .कल्पनाताई चौगुले , सचिव शिवाजीराव पाटील , माजी प्राचार्य डॉ .जे.के.पवार , जि .प. सहा .लेखाधिकारी अभिजीत पाटील , संचालक डॉ .अजय चौगुले ,जवान अमर पाटील , प्र. प्राचार्या डॉ .व्ही.पी. पाटील , संचालक प्रकाश पाटील , डी.एड. चे प्राचार्य गजानन शिंदे, आय .टी.आय.चे प्राचार्य सुरेश पाटील उपस्थित होते . १०वी व १२वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणप्रत्र प्रमुख पाहुणेच्या हस्ते देण्यात आले . स्वातंत्रदिनी वाघा सीमेवर प्रात्यक्षिक मध्ये सहभागी झालेले करंजफेणचे जवान अमर पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ . उषा पवार यांनी केले .स्वागत प्रा.एस.पी. कुंभार केले . पाहुण्यांची ओळख प्रा .आर.बी. पाटील यांनी करून दिली .सुत्रसंचालन सौ .सीमा शिवाजी पाटील व सौ . एस .एस .पाटील यांनी केले .आभार मुख्याध्यापिका टी .के. पाटील यांनी मानले .
